Saturday, July 11, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Nashik Regional Transport Office) सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात (Strike) सहभाग घेतल्यामुळे मंगळवारपासून कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे परवाना, वाहन नोंदणी आणि कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Balasaheb Thorat : विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माजी मंत्री थोरातांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “मविआचे सर्वसंमतीचे उमेदवार….”

समन्वय समितीच्या आवाहनानुसार कर्मचाऱ्यांनी (Workers) कामबंद आंदोलन पुकारले असून कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या चाचण्या व नूतनीकरण प्रक्रिया बंद पडल्या आहेत. तसेच नवीन वाहनांची नोंदणी, क्रमांक प्लेट प्रक्रिया आणि व्यावसायिक वाहनांचा कर भरणे ही कामेही थांबली आहेत. लायसन्स चाचणीसाठी पूर्वनियोजित वेळ घेऊन आलेल्या नागरिकांना काम न झाल्याने परत जावे लागले. “अपॉइंटमेंट घेऊनही काम झाले नाही. वेळ आणि प्रवासाचा खर्च वाया गेला,” अशी प्रतिक्रिया एका अर्जदाराने दिली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नागरिकांच्या सतर्कतेने चोर रंगेहात पकडला; चोप देऊन पोलिसांच्या केले स्वाधीन

जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. “ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असे कर्मचारी प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांना निवेदन दिले. यावेळी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सचिव शिरीन शहा आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ जुलै २०२६ : ई-२० चा गदारोळ अन् संभ्रमाचे...

0
देशभरात इथेनॉलमिश्रित ई-२० पेट्रोलच्या वापरावरून सध्या उठलेले वादंग केवळ तांत्रिक स्वरुपाचे नसून थेट सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाशी आणि विश्वासाशी जोडलेले आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलाची...