Thursday, October 29, 2026
Homeनगरमतदार यादीतील घोळ कायम! नावापुढे डिलेटेड शिक्का, मतदार आल्या पावली माघारी

मतदार यादीतील घोळ कायम! नावापुढे डिलेटेड शिक्का, मतदार आल्या पावली माघारी

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली असून मतदान यादीत नाव असून देखील त्यापुढे डिलेटेड असा शिक्का असल्याने नागरिकांना मतदान करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने मतदार मतदानाला मुकले. त्यांनी नाराजी व्यक्त करत केंद्रावरून माघारी परतले. नगर शहरातील पाऊलबुध्दे काॅलेजच्या केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर येत असून बीएलओकडे मतदार यादीची तपासणी केल्यानंतर काही नागरिकांच्या नावापुढे डिलेटेड नाव असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात निवडूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी मतदारांनी संपर्क केला असता त्यांनी याबाबत आम्हाला काही सांगता येणार नसल्याने सांगून हात झटकले. मतदानाचा हक्क बजावता येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar News : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात वाहतूक...

0
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि.३१ ऑक्टोबर) रोजी...