Thursday, October 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसाधुग्रामच्या जागेला पर्याय नाही; संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात गैर काय : नरेंद्राचार्य महाराज

साधुग्रामच्या जागेला पर्याय नाही; संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात गैर काय : नरेंद्राचार्य महाराज

शेतकरी, पर्यावरण आणि कुंभमेळ्याचा सुवर्णमध्य साधण्याचे आवाहन

पंचवटी | प्रतिनिधी
झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत आणि वृक्षांचे संरक्षण झाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या जागेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढीच वृक्षतोड करून, त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्रोपण करावे आणि पर्यावरण व विकासाचा सुवर्णमध्य साधावा, अशी भूमिका रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम नसून तो देशाची संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेशी जोडलेला आहे. साधू-संतांनी ज्या जागेवर अध्यात्मिक अनुष्ठाने केली आहेत, ती जागा सोडून अन्यत्र जाणे शक्य नाही. त्यामुळे शासनासमोरही काही अडचणी आहेत. या परिस्थितीचा विचार करून समाजानेही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन नरेंद्र महाराज यांनी केले.

- Advertisement -

गरजेपुरतीच वृक्षतोड करुन इतर ठिकाणी वृक्षारोपण करा
वृक्षतोडीला पर्याय म्हणून पुनर्रोपण आवश्यक विकासकामांसाठी काही वृक्ष तोडावे लागल्यास त्याचे गांभीर्य शासनाने लक्षात घ्यावे. गरजेपुरतीच वृक्षतोड करून तोडलेल्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात इतर ठिकाणी वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शासनाकडून पुनर्रोपणाची प्रक्रिया सुरू असून, आमच्या मठालाही रोपे मिळाली आहेत. ती रामशेज आश्रम परिसरात लावण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

साधु-संतांनी सरकारसमोर अवास्तव मागण्या ठेवू नये
साधू-संत सरकारला अडचणीत आणणार नाहीत सिंहस्थासाठी साधुग्राम उभारताना पाणी, सुविधा आणि इतर आवश्यक बाबींचा प्रश्न आहे. मात्र साधू-संतांनी सरकारसमोर अवास्तव मागण्या ठेवू नयेत. थोड्याफार सुविधांमध्येही साधू-संत राहू शकतात. सरकारला अडचणीत आणण्याची आमची भूमिका नाही. सिंहस्थाला अजून सात-आठ महिन्यांचा कालावधी असून पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढेल. त्यामुळे सध्या पाण्याच्या प्रश्नाचे भांडवल करण्याची आवश्यकता नाही, असे नरेंद्र महाराज यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Local Body Election : नाशिकसह राज्यातील ‘या’ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार; राजकीय हालचालींना वेग

कुंभमेळ्याच्या तयारीत पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे
गोदावरी प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन नंदिनी आणि गोदावरी नदी स्वच्छतेसाठी साधू-संतांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी प्रदूषित होणार नाही, यासाठी शासनानेही विशेष लक्ष द्यावे. प्रदूषणामुळे निसर्गाची हानी होते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीत पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. साधुग्रामची जागा कायमस्वरूपी आरक्षित करा दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो आणि प्रत्येक वेळी साधुग्रामच्या जागेचा प्रश्न निर्माण होतो. नाशिकचा कुंभमेळा अन्य जिल्ह्यात भरवता येणार नाही. त्यामुळे साधू-संतांसाठी साधुग्रामची जागा कायमस्वरूपी आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. पुढील कुंभमेळ्यांमध्ये जागेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी नरेंद्र महाराज यांनी केली.

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये कुंभमेळ्यासाठी जमीन घेताना शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शासनाने संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेत द्यावेत. शेतकरी भारतीय संस्कृतीशी जोडलेला असून कुंभमेळ्याला अडथळा निर्माण करण्याची त्यांची भूमिका नाही. मात्र त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या प्रश्नात शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास साधू-संत मध्यस्थी करतील, असेही नरेंद्र महाराज यांनी सांगितले.

दुष्काळात साधू-संत शेतकऱ्यांच्या मदतीला दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणे, जनावरांना चारा आणि गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी साधू-संत पुढाकार घेतील. शासनाची मदत न घेता भक्तांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. कोरोना काळातही शासनाला कोट्यवधी रुपयांची मदत तसेच २६ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, समाजासाठी ४२ उपक्रम सुरू असल्याचे नरेंद्र महाराज यांनी सांगितले. कुंभमेळ्यावर होणारा खर्च हा भारतीय आणि हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी असून तो योग्य आहे. मात्र त्याचवेळी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मदतीलाही साधू-संत प्राधान्य देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही जपावे’ स्थळ, काळ आणि परिस्थितीचे भान ठेवून शासनाने निर्णय घ्यावेत. विकास करताना काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते; मात्र त्याची भरपाई करण्याची जबाबदारीही शासनाने स्वीकारली पाहिजे. कुंभमेळ्याची गरज आणि पर्यावरण संरक्षण या दोन्हींचा समतोल साधून पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे, अशी भूमिका नरेंद्र महाराज यांनी मांडली. .”

ताज्या बातम्या

Nashik Bribe Crime : मालेगाव महापालिका आयुक्तांसह PA अन् अकाउंटंट...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत लाचखोरांना जोरदार दणका दिला आहे. एका कंत्राटदाराच्या कामाचे...