Friday, May 3, 2024
Homeनगरशहराचा गाडा प्रभारीच्या खांद्यावर

शहराचा गाडा प्रभारीच्या खांद्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी) –

महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार काल गुरूवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नियुक्ती न झाल्याने. पर्यायाने आयुक्तांचा प्रभारी

- Advertisement -

चार्ज पुन्हा एकदा जिल्हाधिकार्‍यांकडे जाण्याची आहे. महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाला आयुक्तांच्या सेवानिवृत्तीची माहिती कळविली असली तरी प्रभारी पदाची ऑर्डर निघालेली नाही.

आयुक्त मायकलवार यांच्यासह प्रसिध्दी विभागप्रमुख दिगंबर कोंडा हेही महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या विभागाचा चार्जही प्रभारी असणार आहे. याशिवाय उपायुक्त (कर), शहर अभियंता, ऑडिटर, कामगार अधिकारी या प्रमुख विभागाची जबाबदारी ही प्रभारीकडेच आहे. एकूणच नव्या वर्षात महापालिका अर्थात शहराचा गाडा हा प्रभारींच्या खांद्यावर आला आहे. ऑडिटर चंद्रकांत खरात यांची बदली झाल्याने त्यांचा चार्ज कॅफो प्रवीण मानकर यांच्याकडे देण्यात आला आहे. शहर अभियंता पदावरून सोनटक्के रिटारयर झाल्यानंतर या पदाचा चार्ज अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या