Friday, September 20, 2024
Homeनगरनगरमध्ये 2 विहिरींसह 15 कृत्रिम हौद

नगरमध्ये 2 विहिरींसह 15 कृत्रिम हौद

नागरिकांना निर्माल्य टाकण्यासाठी मनपाकडून स्वतंत्र व्यवस्था

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून शहरात दोन विहिरींसह विविध 15 ठिकाणी कृत्रिम हौद उभारून व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी विहिरींची तपासणी करून स्वच्छता व विहिरींवरील जाळ्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

महानगरपालिकेकडून नेप्ती रोडवरील बाळाजी बुवा विहीर व यशोदा नगर येथील विहिरीची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी तुटलेल्या जाळ्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. शहरात काही गणेशभक्त व भाविकांकडे दीड दिवस, पाच दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे सर्व विसर्जन विहिरींची तत्काळ स्वच्छता करा. विहिरीतील गाळ काढून तेथे पाणी कमी असल्यास पाण्याची व्यवस्था करा, अशा सूचनाही आयुक्त डांगे यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या