Friday, May 3, 2024
Homeनगरमनपाकडून 31 ऑक्टोबरपर्यंत शास्ती माफीमध्ये सूट

मनपाकडून 31 ऑक्टोबरपर्यंत शास्ती माफीमध्ये सूट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या वतीने (Ahmednagar Municipal Corporation) ज्या मिळकत धारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी (Tax) आहे अशा थकबाकी मिळकत धारकांना 2 टक्के शास्तीमध्ये 75 टक्के माफी देऊन थकीत मालमत्ता कराचा (Tax) भरणा करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. तसेच ही सुविधा प्रत्यक्ष भरणा व ऑनलाईन सुद्धा असल्याची माहिती, आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी दिली.

- Advertisement -

नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शस्तीमध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी शहराचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आयुक्त गोरे (Commissioner Shankar Gore) यांच्याकडे केली होती. त्यांनी तसे पत्र आयुक्त गोरे यांना दिले होते. करोनामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे उत्पादन, रोजगार आणि नागरिकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीतील करदात्यांनी मालमत्ताकर भरण्यास आर्थिक अडचणी असल्याची भावना आ. जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्याकडे व्यक्त केली होती.

आ. जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी याबाबत आयुक्त गोरे (Commissioner Shankar Gore) यांना पत्र दिले. सदर पत्राचा विचार करून आयुक्त गोरे यांनी त्यांना असलेल्या अधिकारात 31 ऑक्टोबर अखेर 2 टक्के शास्तीमध्ये 75 सूट दिली असून नागरिकांनी थकीत मालमत्ताकर भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त (कर ) यशवंत डांगे (Deputy Commissioner (Taxes) Yashwant Dange) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या