Friday, May 3, 2024
Homeनगरअहमदनगर : ऑक्सिजनच्या टंचाईने खाजगी डॉक्टर चिंतेत

अहमदनगर : ऑक्सिजनच्या टंचाईने खाजगी डॉक्टर चिंतेत

अहमदनगर (प्रतिनिधी) –

शहरातील रूग्णालयात बेडसावत असलेल्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर टंचाई, करोना रूग्णांबरोबर नातेवाईकांमध्ये

- Advertisement -

असलेले गैरसमज या संदर्भात महापालिकेच्यावतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहरातील डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या प्रमुखांशी ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा केली.

ऑक्सिजनचा तुतवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पुढील 10 दिवसाचे नियोजन केले नाही तर भयानक परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल झालेले आहेत. त्यांनाही ऑक्सिजनची गरज आहे. रूग्णांमध्ये व नातेवाईकांमध्ये रेमडेसिवीर संदर्भात उडालेला गोंधळ आदीं समस्या डॉक्टरांनी मांडल्या.

यावेळी महापौर वाकळे म्हणाले, सर्वांनी मिळून या करोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे. सर्व रूग्णांवर उपचार करावे. उपचाराविना कोणताही रूग्ण वंचित राहणार नाही याची सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी व मनपा प्रशासनाने दक्षता यावी.

यावेळी बैठकीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठयाप्रमाणात जाणवत असल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री यांच्याकडे मनपाच्या जागेमध्ये ऑक्सिजनचा प्लॅट उभारण्यासाठी परवानगी आणि निधी मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस सभागृह नेते रविंद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ. अनिल बोरगे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. शेख निसार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या