Friday, May 3, 2024
Homeनगरनगर - विद्युत साहित्य खरेदीचा विषय 'स्थायी समिती'कडे

नगर – विद्युत साहित्य खरेदीचा विषय ‘स्थायी समिती’कडे

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोना संकटात ठप्प झालेली विकास कामे आता सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिका प्रशासनाने प्रत्येक नगरसेवकांना एक लाख रुपयांचे विद्युत साहित्य खरेदी करण्यास मान्यता दिली असून तो विषय मंजुरीसाठी आता स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. शहरातील लखलखाटाला लाखाचे वटकन प्रशासनाकडून लावले जाणार हे आता निश्चित झाले आहे.

- Advertisement -

एलईडी, सोडीयम व्हेपर, 36 बाय 24 ट्यूब असे जवळपास 36 हजार स्ट्रीट लाईट नगर शहरात आहते. त्यातील जवळपास 15 टक्के म्हणजेच सुमारे पाच हजार बंद पडलेले आहेत. स्ट्रीट लाईट दुरूस्तीसाठी साहित्य मिळावे अशी मागणी नगरसेवकांना महापालिकेकडे केली, मात्र स्टोअर विभागात साहित्यच नसल्याने नगरसेवकांचा हिरमोड झाला. नगरसेवकांची मागणी व निकड पाहता विद्युत विभागाने प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांना सादर केला. त्यानुसार आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रत्येक नगरसेवकांना 1 लाख अशा 67 लाख रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. मात्र हा निधी मंजुरीचा अधिकारी स्थायी समितीचा असल्याने तो स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. स्थायी समितीने ग्रीन सिग्नल दाखविताच स्टोअर विभागामार्फत ही खरेदी केली जाईल. 2018-19 च्या दरपत्रकानुसार ही खरेदी होईल अन् नगरसेवकांना साहित्य मिळेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रत्येक नगरसेवकांला 40 दिवे

प्रत्येक नगरसेवकाला 40 सोडियम व्हेपरचे दिवे, ट्यूब लाईट आरि चोक असे साहित्य दिले जाणार आहे. नगरसेवकच नव्हे तर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी देखील तातडीने साहित्य देऊन बंद स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्याला आता यश मिळाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या