Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAI For Agri-2026 : मुंबईत 'एआय फॉर अ‍ॅग्री-२०२६' जागतिक परिषदेचे आयोजन -...

AI For Agri-2026 : मुंबईत ‘एआय फॉर अ‍ॅग्री-२०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

‘AI for Agri 2026’ ही महत्त्वपूर्ण जागतिक परिषद कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा हा भव्य संगम ठरणार आहे.या परिषदेत कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, नवोन्मेषी स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.ही परिषद महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि केंद्र शासनाचा कृषी विभाग यांच्या पुढाकाराने, तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, FAO, UNDP, IFAD, वर्ल्ड बँक समूह, ADB, ICRISAT, IISc, MSSRF यांसारख्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर आणि शाश्वत कृषी विकासासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

ताज्या बातम्या

MP Bhaskar Bhagare : खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; खासदार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देशातील शेतकरी (Farmer) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर...