Saturday, May 9, 2026
HomeनाशिकMP Bhaskar Bhagare : खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; खासदार भगरेंनी...

MP Bhaskar Bhagare : खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; खासदार भगरेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशातील शेतकरी (Farmer) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. विविध रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रति बॅग सुमारे १२५ ते ३०० रुपये पर्यंत वाढ झाल्यामुळे शेती उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सहकारी संस्थांवरील लिंकिंग सक्ती थांबवावी यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?

खासदार भगरे यांनी पत्रात म्हटले की, 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13 यांसारख्या प्रमुख खतांच्या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होत आहे. यासोबतच खत विक्रीमध्ये लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच खते विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांवरही लिंकिंगची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी गंभीर असून, ही बाब तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांवर अशा प्रकारची अट लादल्यास शेतकऱ्यांना योग्य दरात व पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण होतो, असे खासदार भगरे यांनी नमूद केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या चौकशीचा फास आवळला; आयकर, धर्मादायची एन्ट्री

तसेच नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) राज्यातील अनेक भागांमध्ये अलीकडेच झालेल्या गारपीट, वादळी वारा व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून, भविष्यात खत टंचाईची भीती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे, यासाठी काही मागण्या देखील भगरे यांनी केल्या आहेत.

दरम्यान, खासदार भास्कर भगरे यांनी पत्राच्या शेवटी शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांचे आर्थिक संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारने (Central Government) या गंभीर प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,असे आवाहन देखील केले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक

केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे

१) खतांच्या दरवाढीचा तातडीने पुनर्विचार करून दर कमी करावेत
२) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खतांवरील अनुदान वाढवावे
३) खत विक्रीतील लिंकिंग सक्ती तात्काळ बंद करावी
४) खते विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांवर लिंकिंगची सक्ती करू नये
५) दोषींवर कडक कारवाई करावी
६) खतांचा पुरवठा सुरळीत ठेवून टंचाई टाळावी
७) नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी

ताज्या बातम्या

Lt Gen NS Raja Subramani : लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा...

0
मुंबई । Mumbai भारताच्या संरक्षण सिद्धतेत आणि लष्करी नेतृत्वात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली असून, लेफ्टनंट...