Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआयमा निवडणूक : अर्ज माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट

आयमा निवडणूक : अर्ज माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट

AIMA election: After the withdrawal of the application, the picture will be clear

सातपूर । प्रतिनिधी Satpur

- Advertisement -

आयमाच्या निवडणुकीसाठी AIMA Election उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती, अंतिम मुदतीत 30 जागांसाठी 73 अर्ज दाखल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र माघारीनंतरच withdrawal of the application स्पष्ट होणार आहे आहे.

आयमाच्या निवडणुकीसाठी कार्यकारी मंडळाच्या सहा व कार्यकारिणी सदस्य 24 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. आज कार्यकारी मंडळाच्या सहा जागांसाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर कार्यकारणीच्या 24 जागांसाठी 58 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. या अर्जांची छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सत्तारुढ गटाच्या एकता पॅनल विरुद्ध उद्योग विकास पॅनल यांच्यात ही लढत रंगणार आहे.यात प्रामुख्याने अध्यक्ष पदासाठी निखिल पांचाळ व संजय महाजन यांचे दोनच अर्ज आहेत तसेच उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे व श्रीपाद कुलकर्णी तर मानद सरचिटणीस पदासाठी ललित बुब व एन.डी.ठाकरे यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. तसेच मानद सचिव पदासाठी च्या दोन जागांकरिता पाच अर्ज दाखल झाले असून, यात योगिता आहेर, जितेंद्र आहेर, गोविंद झा, जयंत पवार व कैलास आहेर यांचे अर्ज आहेत.

खजिनदारपदाच्या एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले असून, यात सुदर्शन डोंगरे, राजेंद्र कोठावदे, बाळासाहेब गुंजाळ व आर एस जाधव यांचे अर्ज आहेत. कार्यकारिणीच्या 24 जागांसाठी 58 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत प्रत्यक्ष माघारीनंतर निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार आहे कार्यकारी मंडळाच्या लढतीत एकता विरुद्ध उद्योग विकास हा सरळ सामना होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कार्यकारिणीच्या लढती मात्र माघारीनतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या