Thursday, February 5, 2026
Homeदेश विदेशAir India Plane Crash: सीट नंबर 11A ची गोष्ट; अनलकी सीट दोन...

Air India Plane Crash: सीट नंबर 11A ची गोष्ट; अनलकी सीट दोन व्यक्तींसाठी ठरली लकी, एकाच नंबरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जीव कसा वाचला?

मुंबई | Mumbai
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी मोठा अपघात झाला. उड्डाण घेताच काही सेकंदामध्ये हे विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये आतापर्यंत २४१ जणांचा मृत्यू झाला तर १ प्रवासी आश्चर्यकरित्या बचावला. या विमानातून १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी प्रवास करत होते. विमान अपघातमध्ये २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.

ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान पडले त्याठिकाणच्या ३४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने विमानामधील एक प्रवासी बचावला. अपघात झाल्यानंतर या प्रवाशाने खाली उडी मारत आपला जीव वाचवला. रमेश विश्वासकुमार असे या प्रवाशाचे नाव आहे. उड्डाणानंतर काही सेकंदांनी झालेल्या या भयानक अपघातातून बचावलेल्या एक प्रवासी हा चमत्कारापेक्षा कमी नाही. ४० वर्षीय विश्वास यांना यावेळी या अपघातामध्ये इजा झाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. पण तो ज्या सीटवर बसला होता. त्याचे २७ वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाताचे कनेक्शन समोर आले आहे.

- Advertisement -

रमेश विश्वासकुमार बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होते आणि त्यांचा सीट नंबर 11A होता. तसे पाहायला गेले तर ही 11A ही सीट अनलकी म्हटली जाते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीट नंबर 11A याआधीही एका व्यक्तीसाठी भाग्यवान ठरली होती. सुमारे २७ वर्षांपूर्वी थाई स्टार रुआंगसाक जेम्स लॉयचुसाकदेखील अशाच एका मोठ्या विमान अपघातातून सुरक्षित बचावले होते. त्यांचा सीट नंबर सुध्दा 11A च होता. त्यामुळे सध्या या सीट नंबरवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

YouTube video player

1998 मध्ये थाई एअरवेजच्या विमान अपघातात रुआंगसाक जेम्स हे बालंबाल बचावले होते. त्या भीषण अपघातात 101 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातावेळी रुआंगसाक जेम्स लॉयचुसाक हे 11A सीटवर बसले होते. अहमदाबाद दुर्घटना आणि रमेश विश्वासकुमार यांच्याबद्दल कळताच अंगावर काटा आल्याचे त्यांनी सांगितले. लॉयचुसाक म्हणाला की, माझ्याप्रमाणेच एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन विमानातही चमत्कार घडला. सीट 11A वर बसलेला प्रवासी रमेश विश्वासकुमार बचावला. जरी त्यांच्याकडे आता अपघाताचे तिकीट नसले तरी, त्यांनी सांगितले की त्यावेळी त्यांच्या सीट नंबरचा उल्लेख वर्तमानपत्रांमध्ये होता.

रुआंगसाक फ्लाईट TG261 मधून प्रवास करत होता. लँडिंग करताना ते विमान दलदलीत कोसळले. या विमान अपघातात फक्त ४५ जण बचावले होते त्यामध्ये रुआंगसाकचा समावेश होता. एअर इंडियाच्या अपघातात बचावलेल्या रमेश विश्वासकुमार यांचा सीट नंबर 11A पाहून रुआंगसाक जेम्स लोयचुनाकच्या अंगावर काटा आला. त्याला त्याचा सीट नंबर आठवला.

रुआंगसाक लॉयचुसाकने पोस्टमध्ये म्हटले आहे की, अपघातानंतर १० वर्षे माझ्यासाठी उड्डाण करणे खूप कठीण झाले. वायुवीजन चांगले असले तरी मला श्वास घेण्यास त्रास होत होता. मी कोणाशीही बोलायचो नाही आणि नेहमी खिडकीतून बाहेर बघायचो. कोणालाही खिडकी बंद करू देत नव्हतो कारण त्यामुळे मला सुरक्षिततेची भावना मिळत होती, असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो पुढे म्हणाला की, आजही त्यांना आवाज, वास आणि अगदी ज्या दलदलीच्या पाण्यात विमान पडले त्या दलदलीच्या पाण्याची चव आठवते, असे सांगितले.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये सर्वात पुढे बिझनेस क्लासच्या सीट्स असतात तर त्यानंतर इकॉनोमी क्लास सुरू होतो. या क्लासच्या दरम्यान एक दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूलाच सीट 11 A आहे. हा दरवाजा आत्पकालीन परिस्थितीत वापरता येतो. येथूनच विश्वास हे बाहेर पडले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...