Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा यांना उभं करणं मोठी चूक, अजित पवारांचं वक्तव्य

सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा यांना उभं करणं मोठी चूक, अजित पवारांचं वक्तव्य

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बारामती (Baramati) मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवणे, ही मोठी चूक झाल्याची कबुली अजित पवार दिली आहे. रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक झाली. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली.

त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली.

हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळेंचा मताधिक्याने विजय तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता.

आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत असताना अजित पवारांना बहिणीविरूद्ध बायकोला उभं केल्याची चूक मान्य (lok sabha Election) केलीय. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या असल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरवात

- Advertisment -

ताज्या बातम्या