Thursday, September 19, 2024
HomeनाशिकAjit Pawar : विधानसभेला महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार? अजित पवारांनी स्पष्टच...

Ajit Pawar : विधानसभेला महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक | Nashik

- Advertisement -

अवघ्या चार महिन्यांवर आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) येऊन ठेपल्याने राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) आज नशिक जिल्ह्यातील (Nashik Dindori) दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून जनसन्मान यात्रेला () सुरुवात झाली आहे. मात्र, त्याआधी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभेच्या जागावाटपासह विविध विषयांवर भाष्य केले.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,”या जनसन्मान यात्रेच्या (Jan Samman Yatra) माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. महायुती सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ज्या योजना आणल्या आहेत त्याची माहिती शेतकऱ्यांना आणि बहि‍णींना व युवा वर्गाला देणार आहोत. काल अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करण्याची भूमिका आम्ही घेतली असून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून पुढे जात आहोत”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा; गुलाबी जॅकेट, बस अन् बरचं काही

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, “आमच्या तीनही पक्षांकडे ज्या-ज्या जागा (Seat) आहेत त्या-त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी (Party) आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल,असे अजित पवार म्हणाले.

तर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते भूमिका मांडतात. अनेकदा सभागृहात एकमताने यावर निर्णय झाले आहेत. राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून वेळोवेळी निर्णयही घेतले आहेत. परंतु, काही निर्णय उच्च न्यायालयात (High Court) टिकले पण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) टिकले नाहीत. त्यामुळे आम्हाला कोणालाही नाराज करायचे नसून समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर; गृह, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार?

अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाचे (Pink Colour) जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या जनसन्मान यात्रेसाठी गुलाबी रंगाची खास बस (Bus) देखील तयार करण्यात आली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंगही देण्यात आला आहे. तसेच या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट परिधान केले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची हवा पाहायला मिळत असून हा रंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या