Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: अजित दादांच्या विमानाचा ३ हजार तासांचा डेटाच उपलब्ध नाही; रोहित...

Rohit Pawar: अजित दादांच्या विमानाचा ३ हजार तासांचा डेटाच उपलब्ध नाही; रोहित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचा अपघात नव्हे तर घातपात होता, असा दावा केला आहे. या अपघाताबाबत त्यांनी अनेकदा मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहे. असे असतानाच त्यांनी एक्सवर पोस्ट करत नवा दावा केला आहे.

रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले, “स्व.अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी VSR ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल तर DGCA ने CID ला कळवणे आवश्यक का समजले नाही?” “DGCA आणि VSRची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता, अजितदादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकले. केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी! ‘केरळ’चे नाव बदलणार; केंद्रीय मंत्रीमंडळाची नामांतरास मंजूरी

दरम्यान, अजित पवारांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातामागे घातपाताची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. त्यामुळे त्यांनी सातत्याने यावर मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांच्या पातळीवर केलेल्या तपासातील काही मुद्दे माध्यमांसमोर मांडले.

ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत त्यांनी सातत्याने चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी या विमानाची 5 हजार तास उडण्याची क्षमता होती. ज्यावेळी अजित पवारांना हे विमान सेवेसाठी दिले, तेव्हा फक्त 10 ते 15 तासच शिल्लक होते. त्यामुळे असे विमान अजित पवारांना दिलेच नव्हते पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...