Thursday, May 2, 2024
Homeनगरभंडारदरा धरण आज ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

भंडारदरा धरण आज ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर नगर जिल्ह्याला ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. आज सायंकाळी धरणाचा पाणीसाठा दहा टीएमसी झाला असून उद्या रविवारी भंडारदरा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून भंडारादरा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर येथे आज 290 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात सुमारे पाऊण टीमसी पाणी आले. आज सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9 हजार 606 होता.

आज दिवसभरही पाणलोट क्षेत्रात पावसाचे थैमान सुरू होते. बारा तासात भंडारदरा येथे 79 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारा तासातच धरणात 439 दलघफु नवीन पाणी आले, आज सायं धरणाचा पाणीसाठा 10001 दलघफु होता.

धरणात नवीन पाण्याची जोरदार आवक सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रातील आजचा पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे-

घाटघर- 290, रतनवाडी- 270,

पांजरे- 266, वाकी- 195,

भंडारदरा- 263

धरणातील पाणी साठा दलघफुमध्ये – (सायं 6 वाजता)

भंडारदरा- 10001 (91.60 टक्के)

निळवंडे- 5889 (70.78 टक्के)

मुळा- 17208 (66.18 टक्के)

सकाळी 6 वाजता-

आढळा- 640, (60.38 टक्के)

भोजापुर- 322 (89.19टक्के)

मुळा नदीचा कोतुळ येथील विसर्ग- 11152 क्यूसेक

- Advertisment -

ताज्या बातम्या