Tuesday, March 25, 2025
Homeनगरअकोलेतील शोध मोहीम थांबली! प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, सहा जणांना...

अकोलेतील शोध मोहीम थांबली! प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, सहा जणांना जलसमाधी

अकोले । प्रतिनीधी

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह आज सकाळी सापडले. बुधवार पासून याठिकाणी झालेल्या अपघातात एकूण सहा जण बुडून मृत्यू पावले आहेत.

- Advertisement -

बुधवारी प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेत असतांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून सहा जण नदीपात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह गुरूवारी सापडले होते तर दोन जन बचावले होते. बेपत्ता दोघांचे मृतदेह शोध घेण्याचे काम सुरू होते. ठाणे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदी पात्रात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे मृतदेह आढळून आले.

बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पाञात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड, ता सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ ,रा .पेमगिरी, तालुका संगमनेर) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. पण बुधवारी रात्रीपर्यंत त्याला शोधण्यात यश आले नाही.बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते. त्याप्रमाणे या दलाचे पथक तीन गाड्यां मधुन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळीच शोध कार्यास सुरुवात केली. दोन बोटी मधुन ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक बोटीत पाच जवान होते तर एका बोटीत गणेश मधुकर देशमुख (वय -३७, रा.सुगाव बुद्रुक ) या स्थानिक युवकाला घटनेचे निश्चित ठिकाण दर्शविण्या साठी बरोबर घेण्यात आले होते.

दोन पैकी एक बोट बुधवारी दोन युवक जेथे बुडाले त्या जागेकडे जात असतांना तेथे असलेल्या मोठ्या भोवऱ्यात अडकली. नदीपात्रात असलेल्या दगडी बंधाऱ्या मुळे त्या ठिकाणी एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे व पाण्याचा वेगही तेथे प्रचंड होता. भोवऱ्यात अडकलेली बोट गरगर फिरली आणि पलटी खाऊन बुडाली. बोटीवरील सर्व जण पाण्यात फेकले गेले. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे त्यांना बाहेर पडण्यास अडथळे निर्माण होत होते. ही घटना घडताच दुसरी बोट तात्काळ मदतीसाठी धावली. त्यामुळे दोन जणांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले मात्र अन्य तिघांचे प्राण ते वाचू शकले नाही. या तिघांचेही मृतदेह सापडले. या बोटीवरील स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख व पहिल्या दिवशी बुडालेला अर्जुन जेडगुले याचा मात्र शोध लागत नव्हता.

सहा जणांना जलसमाधी

प्रकाश नाना शिंदे (पोलीस उपनिरीक्षक)
वैभव सुनील वाघ(चालक)
राहुल गोपीचंद पावरा(कॉन्स्टेबल )
सागर पोपट जेडगुले (रा. धुळवड,ता.सिन्नर)
अर्जुन रामदास जेडगुले(रा. पेमगिरी, त्ता.संगमनेर)
गणेश मधुकर देशमुख (रा.सुगाव बुद्रुक )

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...