अकोले |प्रतिनिधी| Akole
मुळा पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्याने अकोले (Akole) तालुक्यातील आंबीत लघु पाटबंधारे तलावानंतर मुळा नदीवरील (Mula River) पिंपळगाव खांड धरण आज गुरुवारी पहाटे भरले आहे. पहाटे 5.30 वाजता पिंपळगाव खांड धरण (Pimpalgaon Khand Dam) ओव्हर फ्लो होऊन मुळा नदीचा पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेनं झेपावला आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रात मंगळवार पासून पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग सुरु झाली बुधवारी रात्रभर सुरु असलेल्या संततधार पावसाने मुळा नदीची (Mula River) आवक वाढली. यामुळे 600 दल घ फु क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले. मुळा नदीच्या उगमावर आंबीत येथे असणारे 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबीत लघु पाटबंधारे तलाव (Pond) 27 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ओव्हर फ्लो झाला.जिल्ह्यातील हा पहिला ल.पा.तलाव भरला होता. यानंतर आता पिंपळगाव खांड हे धरण भरले आहे.
मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा (Sahyadri Mountain Ranges) आता ओल्या चिंब झाल्या आहे. ओढे, नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला. पिंपळगाव खांड धरणात मोठी पाण्याची आवक झाली. आजही पावसाचे सातत्य टिकून आहे.
21376 क्यूसेस पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे झेपावला आहे. मुळा नदीवर असणार्या राहुरी (Rahuri) तालुक्यातील 26 टी एम सी क्षमतेच्या मुळा धरणात (Mula Dam) आता आवक सुरू होणार आहे. अकोले तालुक्यातील आंबित ल.पा. तलावानंतर आता पिंपळगाव खांड भरले. यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे धरण भरले आहे. मुळा नदी वाहती झाल्याने संगमनेर (Sangamner)-अकोले तालुक्यातील मुळा परिसरात आनंद व्यक्त होत आहे.





