Friday, May 3, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 'त्या' चिमुकलीचे निधन

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ‘त्या’ चिमुकलीचे निधन

अकोले | प्रतिनिधी

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे अखेर आज निधन झाले आहे.

- Advertisement -

मंगळवारी सायं ७ वाजेच्या सुमारास अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील माही जनक वैद्य (वय दीड वर्ष) ही मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर रित्या जखमी झाली होती.

देशातली सर्वात स्वस्त अन् मस्त एसयूव्ही Tata Punch भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत

बिबट्याच्या जबड्यातून दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. अकोले येथे तिच्या वर उपचार सुरु होते. त्या चिमुकलीला २५ टाके टाकावे लागले होते.

तिच्या परिस्थितीत विशेष सुधारणा होत नसल्यामुळे त्याच दिवशी रात्री तिला पुढील उपचारासाठी प्रवरानगर येथे हलविण्यात आले.

मात्र दोन दिवसांच्या संघर्षानंतर आज गुरुवारी दुपारी तिची प्राणज्योत अखेर मालविली. तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

१६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या