Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAkshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या 'एन्काऊंटर'वरून उच्च न्यायालयाची पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या ‘एन्काऊंटर’वरून उच्च न्यायालयाची पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

मुबंई | Mumbai

बदलापूर (Badlapur) शाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) तातडीने फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तसेच अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

यावेळी न्यायालयाने (Court) सुनावणीदरम्यान ठाणे पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.चार पोलिस अधिकारी असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला? ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळी मारली त्याने कमरेच्या खाली गोळी ‌मारली पाहिजे होती?, कितीच्या बँचचे ते‌ पोलिस अधिकारी आहेत?, १९९२ च्या पोलिस बँचचे अधिकारी आहेत का?’ असे प्रश्न न्यायालयाने विचारले. तसेच न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ‘आजच जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या हाताच्या पंजाचे नमुने घ्या. तुम्ही फायर करताना पायावर, हातावर केले पाहिजे होते. हे एन्काऊंटर म्हणता येणार नाही. तसेच, आरोपीवर हल्ल्याप्रकरणी एफआयआर (FIR) कधी झाला?, घटनेच्या ठिकाणी तुम्ही पुराव्यासाठी सील केले होते का?, आरोपीने पिस्तुल वापरले की रिव्हॉल्वर? असेही प्रश्न उपस्थित केले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

तर यावर सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) पिस्तुल वापरली असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच न्यायालयाने पुढे पिस्तुल लोडेड होती का? मग आरोपीने ती कशी काय वापरली.’ असाही प्रश्न विचारला यावर उत्तर देताना वकिलांनी पिस्तुल लॉक नव्हती असे सांगितले. तसेच सरकारी वकिलांच्या उत्तरानंतर न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्ही जे सांगताय ते सत्य मानायला कठीण आहे. साधा माणूस पिस्तुल वापरु शकत नाही. त्याला ताकद लागते’ असे म्हणत पिस्तुल लॉक का ‌नव्हतं? जर एखाद्या आरोपीला असे घेऊन जाता तर इतका निष्काळजीपणा का?, असा सवालही यावेळी न्यायालयाने केला. तर पिस्तुलवर आरोपीच्या हाताच्या खुना असायला पाहिजेत. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा,’ असे आदेश न्यायालयाने दिले.

हे देखील वाचा : Accident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार

तसेच न्यायालयाने पुढे म्हटले की, आरोपी अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असे तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता अशा परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते, असे म्हटले. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.

हे देखील वाचा : मोठी बातमी! नवव्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडले, मराठा बांधवांना आवाहन काय?

त्यासोबतच न्यायालयाने अक्षय शिंदेला नेताना त्या पोलिस व्हॅनमध्ये जेवढे पोलिस होते, त्या सर्वांचे हाताचे ठसे, हॅण्डवॉश मिळवा, दोन्ही पिस्तुलांवरील ठसेही घेऊन फॉरेन्सिककडून अहवाल मिळवा. अक्षयवर किती अंतरावरून गोळी झाडली गेली, त्याच्या शरीरावर जखमा आढळल्याचे शवविच्छेदनात आले असेल तर त्या जखमा कशाच्या व कधी झाल्या असतील, याचाही अहवाल फॉरेन्सिककडून मिळवा. तसेच अक्षय शिंदेला नेताना त्या पोलिस व्हॅनमध्ये त्यावेळी असलेले चार पोलीस आणि व्हॅनचा चालक या पाचही जणांचे कॉल डेटा रेकॉर्ड देखील संबंधित मोबाईल कंपन्यांकडून मिळवा, असे निर्देश सीआयडीला दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या