Monday, May 20, 2024
Homeजळगावसर्वोदय हायस्कूलच्या आवारात दारूड्यांचा धुमाकूळ

सर्वोदय हायस्कूलच्या आवारात दारूड्यांचा धुमाकूळ

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

तालुक्यातील किन्ही गावातील रस्त्यावर असलेल्या सर्वोदय हायस्कूलच्या (Sarvodaya High School) आवारात (premises) गेल्या अनेक वर्षांपासून शाळा संध्याकाळी 5 वाजता सुटली की रात्रभर या शाळेच्या आवारात गावातील दारूडे (Village liquor)आपला दारू पिण्याचा मुक्काम व अड्डा समजून या शाळेच्या परिसरात खेलेआम दारू पीत (drinking alcohol) असून या दारूड्यांच्या गावठी दारूच्या पंन्या तसेच देशी व विदेशी दारूच्या खाली बाटल्या (Bottles of alcohol) व चखण्याचे खाली फकीटे तिथंच टाकून (discarding) देत असतात व याचा त्रास शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना (Troubled school teachers and students) भोगावा लागत असून शिक्षक व विद्यार्थी रोजच या दारूड्यांनी केलेल्या घाणीचे स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign ) राबवत असतात.

- Advertisement -

यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून या दारूड्यांचा बंदोबस्त करावा म्हणून मुख्याध्यापक यांनी पोलिसांना तोंडी, लेखी निवेदन देऊन ही आजपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे या दारूड्यांना कोण आवर घालणार व कसा आवर बसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षक बोलायला गेले तर हे दारूडे दारूच्या नशेत शिविगाळ करतात व जीवे मारण्याची धमकी देत असतात.

एवढ्यावरच नाही तर ज्या शाळेत विद्यार्थी आपले भविष्य घडविण्यासाठी या विद्येच्या मंदिरात शिक्षण घायला येतो त्याच विद्येच्या मंदिरात या दारूड्यांनी या शाळेच्या आवारात लघुशंका व शौचास बसतात. यामुळे खूप संताप व्यक्त होत आहे. शाळा सकाळी 10 ते 5 असल्याने संध्याकाळ पासून तर सकाळपर्यंत या शाळेच्या आवारात या दारूड्यांना खुलेरान झाले आहे. तरी या दारूड्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षण, विद्यार्थी, पालक व गावकरी करीत आहे.

पोलिसांना निवेदन देऊनही कार्यवाही नाही- मुख्याध्यापक

आम्ही बर्‍याच वेळा पोलिसांना याबाबत तोंडी, लेखी निवेदन दिले आहे. तरी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही या दारूड्यांवर झाली नाही. आम्ही शिक्षक व विद्यार्थी रोजच शाळा भरण्या अगोदर स्वच्छता करीत असतो. पण हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शैक्षणिक नुकसान होत असून खूप चीड निर्माण होत आहे. तरी या दारूड्यांवर कार्यवाही करून यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, असे मुख्याध्यापक डी. पी.साळुंखे यांनी दै.‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या