Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकनाशी आश्रमशाळेतील सर्व बाधित विद्यार्थिनींवर योग्य औषधोपचार करावेत - आदिवासी विकास मंत्री...

कनाशी आश्रमशाळेतील सर्व बाधित विद्यार्थिनींवर योग्य औषधोपचार करावेत – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आदिवासी विकास विभागाच्या कनाशी येथील आश्रमशाळेतील बाधित सर्व विद्यार्थिनींवर योग्य ते औषधोपचार करावेत. आरोग्य विभागाने विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी दिल्या.

कनाशी, ता. कळवण येथील आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना त्रास झाल्याने त्यापैकी काही विद्यार्थिनी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. ऊईके यांनी आज सायंकाळी कनाशीच्या आश्रमशाळेसह उपजिल्हा रुग्णालय, अभोणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, कनाशी येथे जात विद्यार्थिनी व त्यांच्या समवेत असलेल्या पालकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. त्यावेळी मंत्री डॉ. ऊईके बोलत होते.

यावेळी आमदार नितीन पवार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नरेश अकुनुरी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीवर सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती दिली.

त्यानंतर मंत्री डॉ. ऊईके यांनी आश्रमशाळेस भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी आमदार श्री. पवार, प्रकल्प अधिकारी अंकुनुरी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. ऊईके यांनी सांगितले की, वसतिगृह परिसरात नियमितपणे स्वच्छता करावी. आवश्यकतेनुसार धुरळणी करावी. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आणखी एक परिचारिकेची नियुक्ती करावी. विद्यार्थिनींनी आपले शिक्षण पूर्ण करावे. तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई, वैद्यकीय प्रवेशासाठी नीट या परीक्षांची परिश्रमपूर्वक तयारी करावी. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण सुविधा आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृहाच्या क्षमतवाढीसाठी सकारात्मक आहे. त्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...