नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचा सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार असून यात मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सहभागी करण्यात आले आहे. शिवाय सुप्रिया सुळेंकडे पुन्हा एकदा खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची केंद्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपावली आहे. त्यांच्यावर खासदारांच्या गटाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यात विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या गटामध्ये महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, प्रफुल पटेल, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांचा सहभाग असून या सर्वपक्षीय खासदार गटाचे नेतेपद सुप्रिया सुळेंकडे असणार आहे. परिणामी सिंगापूर देशात जाणाऱ्या खासदार गटाचे नेतृत्व या सुप्रिया सुळे करणार आहेत.
यासोबतच, इंडोनेशियाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदेंकडे असणार आहे. तसेच अर्जेंटिनाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक चव्हाण हे करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या नेतेपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मोरोक्कोला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अरविंद सावंत हे करणार आहे.
दुसरीकडे, केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश मस्के आणि संजय राऊत हे एकत्र असणार आहे. तर चिलेला जाणाऱ्या शिष्टमंडळात रवींद्र वायकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे बाल्टिक्स देशांचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळात असणार आहेत.
विरोधी पक्षातील जेष्ठ खासदारांवर या देशांची असणार जबाबदारी
यात विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी काँग्रेसचे शशी थरूर (फ्रान्स), पी. चिदंबरम (इटली), के. सी. वेणुगोपाल (पोर्तुगाल), मनीष तिवारी (ऑस्ट्रेलिया) आणि गौरव गोगोई (फिलिपिन्स), डीएमकेच्या के. कनिमोळी (ग्रीस), तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन (चिली) आणि अभिषेक बॅनर्जी (अल्जेरिया), शिवसेना-यूबीटीचे अरविंद सावंत (मोरोक्को)
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (सिंगापूर), एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (ओमान), समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (जपान) आणि राम गोपाल यादव (इजिप्त), आम आदमी पक्षाचे संजय सिंह (कॅरिबियन देश) तसेच आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन (मादागास्कर) हे संबंधित गटांचे अध्यक्ष असतील.




