Monday, May 20, 2024
Homeनाशिकनाशिकमधील शाळांची घंटा सोमवारी वाजणारच नाही

नाशिकमधील शाळांची घंटा सोमवारी वाजणारच नाही

नाशिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शाळा सोमवारपासून सुरु होणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. अखेरी नाशिकमधील शाळा डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -

कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळा या ०४ जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.

कोविड व्यवस्थापन बैठकीत, जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की जगातील अनेक देशात पुनश्च करोना साथ पसरत आहे. दिवाळीपूर्वी नाशिक जिल्ह्यात लक्षणीय सुधार जाणवत होता. मात्र,दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर उद्यापासून शाळा सुरू करण्याबाबत शहरी भागात पालक प्रतिकूल तर ग्रामीण भागातील पालकात संभ्रमावस्था असल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी बैठकीत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या