Friday, May 3, 2024
Homeनाशिकबुधवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू

बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर कोविड नियमांचे पालन करणे व आरोग्य विषयक बाबींच्या अनुषंगाने दक्षता घेण्याबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत. पालकांनी भीती न बाळगता आपल्या पाल्यांना निसंकोचपणे बुधवार (दि.१५) पासून शाळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), डॉ. मच्छिंद्र कदम (Dr. Machhindra Kadam) यांनी केले आहे…

- Advertisement -

जिल्ह्यात 1154 राज्य मंडळाच्या शाळा तर सिबीएसई आयसीएसईसह एकूण 1335 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळा सोमवार (दि.13) पासून सुरू झाल्या असून विद्यार्थी प्रत्यक्ष 15 जूनपासून शाळेत येणार आहेत.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निर्देशानुसार 15 जूनपासून शाळा प्रवेशोत्सव होत आहे. पालकांनी भिती न बाळगता निसंकोचपणे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, कोविड नियमांचे पालन करणे व आरोग्यविषयक बाबींचे अनुषंगाने दक्षता घेण्याबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत.

नाशिक जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. शाळेत आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.

यासाठी जिल्हा आरोग्य आधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आरोग्य विभागामार्फत सहकार्य होणार आहे, तशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Gangatharan D.) व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर (Dr. Kapil Aher) यांनी आढावा घेऊन सूचना दिल्या आहेत.

12 ते 14 वयोगटातील पहिल्या डोसचे 85.93 टक्के लसीकरण पूर्ण करत नाशिक जिल्हयाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. तर 15 ते 17 वयोगटाच्या पहिला डोस लसीकरणात जिल्हा 12 व्या स्थानावर आहे. शाळा सुरु होत असताना पालकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने पालकांनी भीती न बाळगता मुलांना शाळेत पाठवावे, कोविड काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी नियमित शाळा सुरू होणे अत्यंत महत्वाचे आहे, तरी ज्या 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांचे शाळेत लसीकरण कॅम्प घेऊन लसीकरण होईल व ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांना दुसरा डोस उपलब्ध होईल.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय, आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहाने सुरू होत आहे. तरी पालकांनी भिती न बाळगता आपल्या पाल्यांना निसंकोचपणे 15 जून 2022 पासून शाळेत पाठवावे, असे आवाहन डॉ. मच्छिंद्र कदम यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या