Thursday, July 2, 2026
Homeनाशिकपूर्णवेळ सुरु राहणार दुकाने अन् आस्थापना; कंटेन्टमेंट झोन प्रतिबंध कायम

पूर्णवेळ सुरु राहणार दुकाने अन् आस्थापना; कंटेन्टमेंट झोन प्रतिबंध कायम

नाशिक । प्रतिनिधी

कंटेन्टमेंट झोन वगळता परवानगी देण्यात आलेली जिल्ह्यातील सर्वच दुकाने व व्यावसायीक आस्थापनांवरील वेळेचे बंधन हटविण्यात अाले आहे. ही दुकाने पूर्णवेळ म्हणजे लॉकडाऊनपुर्वी ज्या वेळेत सुरु केली जात होती त्याच वेळेत सुरु होतील अन् रात्री न्यायालयाच्या निर्णयानुसार १० वाजेनंतर बंद करावी लागतील. समविषमतेचे नियमानुसार दुकाने सुुर करण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही किराणा दुकाने, मेडिकल्स व वैद्यकीय अशा अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना मात्र हा सम -विषमचा नियम लागू नसले. असा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बैठकीत बुधवारी (दि.१०) घेण्यात आला.

- Advertisement -

शासनाने आता शहरे, जिल्हे, गाव ही अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. परंतू त्यातून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शहरातील वाढत्या कोरोना संसर्गास पायबंद घालण्याच्या दृष्टीने बुधवारी (दि.१०) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त अन् मनपा आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये सद्यस्थितीत शहरी भागात होणारी गर्दी हे कोरोनचा संसर्ग वाढी खतपाणी घालणारे असून, ही अत्यंत धोकादायक बाब असल्याने त्यावर तात्काळ पावले उचलणे गरजेचे असल्याने तातडीची बैठक घेत त्यावर चर्चा करण्यात आली.

शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या मर्यादेमुळे दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने तसेच काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सम-विषम नियमामुळे एक आड एक दिवस बंद राहिल्याने नागरिक वस्तूंचा संचय करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

वारंवार दुकानांत, बाजारात येत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदीचा वापर करून दुकानांचा कार्यकाळ वाढल्यास गर्दी विखुरली जाऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन होणे सुकर होईल. असे एकमताने ठरवण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

तसेच निर्बंध हटविताना प्रत्येक दुकानदारास आपल्या दुकानात अथवा दुकानाच्या परिसरांत सोशल डिस्टन्सीचे पालन होतेय किंवा नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी दुकानदारांवर जबाबदारीही निश्चित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंदी असलेली दुकाने खुली असल्यास फौजदारी 

कंटेंटमेंट झोन क्षेत्रात लागू असणारे निर्बंध येणाऱ्या काळात अत्यंत कठोरतेने अंमलात आणले जातील. तसेच ज्या व्यावसायांना, दुकानांना बंदी घालण्यात आली आहे, अशी दुकाने व आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

थोडक्यात महत्वाचे

– सम, विषमतेच्या निर्बंधातून किराणा दुकाने, वैद्यकीय सेवा जीवनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
– कंटेंटमेंट झोन मधील निर्बंध अधिक कठोर करणार.
– सोशल डिसिटन्सीचे होणार कठोर पालन; उल्लंघन झाल्यास दुकानदारांवर कारवाई होणार.

होणारी गर्दी पाहाता वेळेची मर्यादा हटविणे आवश्यक असल्याने माझ्यासह झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त असे आम्ही मिळून वेळेचे बंधन हटविण्याबाबत विचार करत होतोे. तसे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन निर्णय अंतिम झाला. सम-विषमनुसार ते सुरु असतील. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने सुरु असतील. कंटेन्टमेंट झोनवरील निर्बंध कायम आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...