Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : अमरनाथ यात्रेच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक

Crime News : अमरनाथ यात्रेच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक

टूर अँड ट्रॅव्हल्स चालकाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अमरनाथ व वैष्णोदेवी यात्रेला हेलिकॉप्टरसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून सात महिलांसह एका पुरूषाकडून एक लाख 51 हजार रूपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिनेश पोपट भोर (रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत स्मिता अनिल शितोळे (वय 60, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी बुधवारी (10 जून) फिर्याद दिली आहे. शितोळे कुटुंबाचे वडगाव गुप्ता येथे प्लंबिंग हार्डवेअरचे दुकान असून दुकानाशेजारी राहणार्‍या दिनेश भोरची त्यांच्याशी ओळख झाली होती. भोर याने स्वतःचा बाबा अमरनाथ टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स नावाने पर्यटन व्यवसाय असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. मार्च 2025 मध्ये भोर याने शितोळे यांच्या पतींना अमरनाथ, वैष्णोदेवी आणि इतर धार्मिक स्थळांच्या सहलीचे आयोजन केल्याचे सांगितले. हेलिकॉप्टरने जाणार्‍या प्रवाशांसाठी प्रत्येकी 32 हजार 500 रूपये आणि पायी जाणार्‍यांसाठी 26 हजार 500 रूपये खर्च येईल, असे त्याने सांगितले.

यात्रेची माहिती मिळाल्यानंतर शितोळे यांनी आपल्या मैत्रिणींनाही सहलीबाबत माहिती दिली. त्यानुसार सात महिला आणि एक पुरूष असा गट सहलीसाठी तयार झाला. त्यांनी दिलेली रक्कम तसेच शितोळे दाम्पत्याची रक्कम मिळून एकूण एक लाख 51 हजार रूपये दिनेश भोर याच्या मोबाईल क्रमांकावर फोन-पेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठविण्यात आले. दरम्यान, त्यानंतर अमरनाथ परिसरात खराब हवामान असल्याचे, हेलिकॉप्टर सेवा बंद असल्याचे कारण देत तो वारंवार टाळाटाळ करू लागला. अखेर सहल रद्द झाल्यानंतर पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्याच्याकडे टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहितीही फिर्यादीला मिळाली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

मुंढे इफेक्ट फक्त किचनमध्ये नको, एफडीएच्या कार्यालयातही दिसावा; संजय राऊतांचे तुकाराम...

0
मुंबई । Mumbai आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे...