Sunday, May 5, 2024
Homeनाशिकखुशखबर! अंबड एमआयडीसीच्या गाळ्यांचे दर 10% कमी

खुशखबर! अंबड एमआयडीसीच्या गाळ्यांचे दर 10% कमी

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

महाउद्योग मित्रच्या माध्यमातून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना स्वत:चे गाळे मिळावे, यासाठी मागिल दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. एमआयडीसीने बांधलेल्या गाळ्याचे दर कमी करण्याची मागणी नोंदवण्यात आलेली होती.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर या फ्लॅटेड बिल्डंगच्या गाळ्यांचे दर कमी करण्याची मागणी एमआयडीसीने मान्य केली आहे. 28 डिसेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या गाळ्यांचे दर 10 टक्के कर कमी करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

महाउद्योग मित्र संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला असून यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ही ठोठावले आहेत. याचाच परिपाक म्हणून काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये उद्योजक संघटनांच्या विभागीय बैठकीत अलबनगल यांनी या प्रकल्पातील गाळ्यांची किमत 10 टक्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, चार महिन्यांपूर्वी निघालेल्या निवीदा त आश्वासन पाळले गेले नसल्याचे स्पष्टपणे जाणवल्याने उद्योजक नाराज झाले होते.

ही नाराजी महाउद्योग मित्र आघाडीच्या माध्यमातून पेशकार यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, एमआयडीसी सीईओ अलबनगल यांच्याकडे व्यक्त करत आश्वासन पाळण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने संघटनेचा विजय झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे एक हजार चौरस फुटांचा गाळा घेणार्या उद्योजकाची किमान चार ते पाच लाख रुपयांची बचत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या