Wednesday, May 28, 2025
HomeनगरAkole : आंबित धरण ओव्हरफ्लो ! पाणी पिंपळगाव खांड धरणाकडे

Akole : आंबित धरण ओव्हरफ्लो ! पाणी पिंपळगाव खांड धरणाकडे

वाकी तलाव निम्मा

कोतूळ |वार्ताहर| Kotul

- Advertisement -

मुळा खोर्‍यात पाऊस कोसळत्त असल्याने या नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित तलाव काल मंगळवारी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे, या तलावातून 150 ते 200 क्युसेकने नदीत विसर्ग सुरु आहे. आता खाली मुळा नदी वाहती झाली असून हे पाणी पिंपळगाव धरणात जमा होऊ लागले आहे. अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे.

मुळा नदी उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण असून अहमदनगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे पहिले धरण आहे. मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे.

वाकी तलाव निम्मा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी डोंगर-दर्‍यातून येणारे ओढे-नाले काही प्रमाणात खळखळत असून धरणात येणारी पाण्याची गती मंदावली आहे. दरम्यान, कृष्णवंती नदीवर असलेला 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव निम्मा भरला आहे. गत आठ-दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मुक्काम ठोकला आहे. अधूनमधून कोसळणार्‍या या पावसामुळे भंडारदरा पाणलोट चिंब होऊन गेला आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी 3007 दलघफू पाणीसाठा होता. धरणातून 780 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 8028 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 2206 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून 370 क्युसेकने कॅनालसाठी पाणी सोडण्यात येत आहे. वाकी तलावात हळुवार पाणी येत आहे. गतवर्षीचाच 44 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने हे धरण यंदा लवकर निम्मे भरले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कर्जतमध्ये वृद्धाचा तर नगरमध्ये तरुणीचा बळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकुळ सुरू केला आहे. या पावसामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या घरांचे नुकसान होताना दिसत...