Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : हॉटेल्समधील स्वच्छतेची होणार पाहणी

AMC : हॉटेल्समधील स्वच्छतेची होणार पाहणी

महानगरपालिका व हायजिन फर्स्टचा उपक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराला खाद्य संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. या खाद्य संस्कृतीचा दर्जा चांगला असावा, ग्राहकांना निर्जंतुक वातावरणात सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिका व हायजिन फर्स्टच्या माध्यमातून स्वच्छ व निर्जंतुक खाद्यसंस्कृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 7 डिसेंबरपासून शहरातील विविध हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. सर्व व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

- Advertisement -

या उपक्रमाच्या नियोजनासाठी डांगे यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी हायजिन फर्स्टच्या वैशाली गांधी, आरती थोरात, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील ग्राहकांना निर्जंतूक अन्न मिळावे या उद्देशाने हायजिन फर्स्ट ही संस्था कार्यरत आहे. शहरातील प्रत्येक हॉटेल हातगाडी, बेकरी, मिठाई येथील स्वयंपाकगृह हे स्वच्छ व निर्जंतूक असावे, व्यावसायिकांनी स्वच्छतेचे प्राथमिक नियमांचे पालन करावे या उद्देशाने महानगरपालिका व हायजिन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व हॉटेल्सच्या भेटी घेवून पाण्याच्या टाकीपासून कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी करून अंमलबजावणी करून घेतली जाईल.

YouTube video player

यामुळे ग्राहकांना सुरक्षित स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ मिळेल, असे गांधी यांनी सांगितले. शहरातील हॉटेल्सची पाहणी 7 डिसेंबर पासून सुरू होणार असून या उपक्रमात महानगरपालिका सहभागी आहे. या उपक्रमास व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करावे, असे आवाहन डांगे व हायजिन फर्स्टकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...