Tuesday, January 6, 2026
HomeनगरAMC : महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

AMC : महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर || मात्र आरक्षण अद्याप प्रलंबित

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत राज्य पातळीवर झालेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागाने महापौर पदाच्या पूर्वीच्या आरक्षणाबाबत सविस्तर माहिती मागवली होती. महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत कोणत्या प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण पडले होते, याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होण्याची शक्यता असून, सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष याकडे लागले आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिकेवर गेल्या 23 महिन्यांपासून प्रशासकीय राज सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.अहिल्यानगर महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या आरक्षण सोडतीनुसार अनेक दिग्गज नेत्यांना महापौरपदाची संधी मिळाली आहे. 2003 मध्ये पहिल्या निवडणुकीत महापौर पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी होते. शिवसेनेचे भगवान फुलसौंदर पहिले महापौर झाले. त्यानंतर 2006 मध्ये खुला प्रवर्गसाठी आरक्षण असल्याने काँग्रेसचे संदीप कोतकर महापौर झाले.

YouTube video player

2008 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप महापौर झाले. 2011 मध्ये महापौर पद महिलेसाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेच्या शिला शिंदे महापौर झाल्या होत्या. 2013 मध्ये पुन्हा खुला प्रवर्गसाठी आरक्षण पडल्याने संग्राम जगताप यांना पुन्हा महापौरपदी संधी मिळाली. मात्र ते आमदार झाल्याने उर्वरित कालावधीसाठी अभिषेक कळमकर यांची महापौरपदी वर्णी लागली होती. 2016 मध्ये महिला आरक्षण निघाल्याने शिवसेनेच्या सुरेखा कदम या महापौर झाल्या होत्या. 2017 मध्ये खुला प्रवर्गतून भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. त्यानंतर अडीच वर्षांसाठी महिला अनुसूचित जाती प्रवर्ग; शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महापौर झाल्या होता.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...