Tuesday, November 17, 2026
HomeनगरAMC : मनपा स्थायी समितीच्या आजच्या सभेत महत्त्वाचे निर्णय होणार

AMC : मनपा स्थायी समितीच्या आजच्या सभेत महत्त्वाचे निर्णय होणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज (मंगळवार) दुपारी 1 वाजता होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा, मोकाट कुत्र्यांचे नियंत्रण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वाचे प्रस्ताव या सभेत चर्चेला येणार आहेत. टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करणे, मोकाट कुत्र्यांचा सांभाळ व नियंत्रण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करणे आणि स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खासगी संस्थेमार्फत चालविण्यास देणे, असे प्रमुख विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले आहेत. या प्रस्तावांवर सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शहरात गरजेनुसार जीपीएस यंत्रणेसह खासगी टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्राप्त झालेली निविदा मंजुरीसाठी सभेसमोर ठेवण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेता या निविदेला मंजुरी मिळाल्यास टँकरव्दारे पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 मधील तरतुदींनुसार मोकाट कुत्र्यांचे नियंत्रण व सांभाळ करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही सभेत मांडण्यात येणार आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एखाद्या सामाजिक किंवा शैक्षणिक संस्थेमार्फत चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या केंद्राचे संचालन खासगी संस्थेकडे सोपविण्याबाबत स्थायी समिती काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. या प्रमुख विषयांसोबतच शहरातील विविध विकासकामांच्या निविदा आणि प्रशासकीय नियुक्त्यांशी संबंधित प्रस्तावांचाही अजेंड्यात समावेश आहे.

ताज्या बातम्या

Shrigonda : श्रीगोंद्यात बिंगो जुगार अड्ड्यांवर एलसीबीचे छापे

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda शहरात खुलेआम सुरू असलेल्या बिंगो जुगारामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असल्याचे वृत्त दैनिक सार्वमतने आठ दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर स्थानिक...