Wednesday, October 14, 2026
HomeनगरAMC : रस्ते विकासासह कचरा व्यवस्थापनावर होणार निर्णय

AMC : रस्ते विकासासह कचरा व्यवस्थापनावर होणार निर्णय

मनपा स्थायी समितीसमोर 22 विषय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी (22 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर तब्बल 22 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून, शहरातील रस्ते विकासकामे, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाच्या निविदांसह घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, विविध विभागांतील नियुक्त्या आणि मानधनवाढीच्या प्रस्तावांवर निर्णय होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान रस्ते विकास योजना राज्यस्तर टप्पा क्रमांक 2 अंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अहिल्यानगर महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि पॅचिंग करण्यासंदर्भातील निविदांनाही मंजुरीसाठी मांडण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरूस्ती व विकासाच्या दृष्टीने हे प्रस्ताव महत्त्वाचे मानले जात आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी शासनाच्या पोर्टलवरील दरांना मंजुरी देण्याचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे. शहरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी लेखाशीर्षामध्ये (पुनर्विनियोजन अंदाजपत्रक) वाढीव तरतूद करण्याचा विषयही महत्त्वाचा आहे.

बुरूडगाव कचरा डेपो येथे खासगी संस्थेमार्फत दर निश्चित करून खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावरही समितीमध्ये चर्चा होणार आहे. कचरा डेपो परिसरातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव, मानधनवाढीचे विषय तसेच इतर प्रशासकीय बाबीही स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : सहकारावर गिते बंधूंच्या वाढत्या प्रभावाची झलक

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सहकारातील स्वार्थाच्या मर्यादा या शिर्षकाचा लेख गेल्या आठवड्यात लिहिला होता. सहकारातील बर्‍या-वाईट घटनांचा तो कोलाज होता....