Wednesday, September 9, 2026
HomeनगरAMC : 10 मार्चला ठरणार ‘स्थायी’चा सभापती

AMC : 10 मार्चला ठरणार ‘स्थायी’चा सभापती

‘महिला व बालकल्याण’च्या सभापती, उपसभापतींची होणार निवड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदांची निवडणूक 10 मार्च रोजी होणार्‍या सभेत पार पडणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम स्थायी समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीचे कामकाज पार पडेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. दोन्ही समित्यांसाठी नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे :

स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज वितरण : 6 ते 9 मार्च (शनिवार-रविवार वगळून) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, अर्ज स्वीकारणे : 9 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत (नगरसचिव कार्यालय), छाननी व निवड : 10 मार्च रोजी सकाळी 11:15 वाजता विशेष सभा सुरू झाल्यावर, अर्ज मागे घेणे : वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर 15 मिनिटांच्या आत.

महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज वितरण : 6 ते 9 मार्च (शनिवार-रविवार वगळून) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, अर्ज स्वीकारणे : सोमवार, 9 मार्च दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत, छाननी : 10 मार्च रोजी स्थायी समिती सभापतीची निवड प्रक्रिया संपल्यानंतर, अर्ज मागे घेणे: उमेदवारांची नावे वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीत.

ताज्या बातम्या

संगमनेर, शेवगाव आणि कर्जतसह ८३ तालुक्यांत पावसाचा मोठा खंड; खरीप हंगाम...

0
मुंबई (प्रतिनिधी) जुलै महिन्यात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील...