Friday, November 6, 2026
HomeनगरAMC : नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा होणार

AMC : नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा होणार

शासनाच्या निर्देशानुसार मनपाकडून पाणी वापराचे सूक्ष्म नियोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबर पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक पाणी मिळावे यासाठी सध्या सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणापासून शहरापर्यंतच्या जलवाहिनीमध्ये कुठेही गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज शोधून ते तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा करताना होणारी गळती आणि अनावश्यक पाणी वापर कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी वॉशिंग सेंटरची तपासणी करून आवश्यक आदेश दिले जाणार आहेत. उद्याने, रस्ते, बांधकामे तसेच अन्य कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापरावर बंदी केली जाणार आहे.

महापालिकेच्या सर्व पाणी कनेक्शनना सक्तीने तोट्या बसविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकांकडून त्याची तपासणीही केली जाणार आहे. नळ सुरू राहिल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय, टाक्या ओसंडून वाहणे किंवा पाइपलाइनमधील गळती यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ नोव्हेंबर २०२६ – ट्रम्प यांच्या मनमानीला चाप

0
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला बसलेला धक्का हा केवळ जागांचा पराभव नाही, तर सत्तेच्या अमर्याद आत्मविश्वासाच्या जोरावर चालविलेल्या वावदूकपणाला मतदारांनी...