Wednesday, September 23, 2026
HomeनगरAMC : महिला व बालकल्याण समितीच्या 2.55 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

AMC : महिला व बालकल्याण समितीच्या 2.55 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

महिलांसाठी जिम, बचत गटांसाठी विक्री केंद्रे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची पहिली महासभा सभापती दिपाली बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील महिला व बालकांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला व बालकल्याणासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार बजेटच्या पाच टक्के रक्कम अर्थात 2 कोटी 55 लाख रूपयांच्या विविध विकासकामांना महासभेत मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

या निधीचा वापर महिला व बालकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांसाठी प्राधान्याने करण्यात येणार आहे. महासभेत शहरातील विविध भागांमधील ओपन स्पेसमध्ये महिलांसाठी ओपन जिमचे साहित्य बसविण्यासाठी 64 लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यासाठी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही समितीने पुढाकार घेतला आहे. पाईपलाईन रोडलगत महापालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसमध्ये महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी 20 लाख रुपये खर्चून वस्तू विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे.

तसेच भिस्तबाग येथील जागेवरही अशाच प्रकारचे विक्री केंद्र उभारण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अर्धांगवायू झालेल्या महिलांना उपचारादरम्यान तसेच घरी आवश्यक असलेल्या सुविधांसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले.

सात शाळांच्या खोल्यांची दुरूस्ती
महापालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सात शाळांच्या खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार स्वच्छतागृह आणि प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. येत्या 2 नोव्हेंबरला मतदान आणि 3 नोव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे....