Friday, May 3, 2024
Homeनगरआता मनपा कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम

आता मनपा कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व महापालिकेतील कर्मचार्‍यांमध्ये वाढत असलेल्या संसर्ग लक्षात घेऊन

- Advertisement -

महापालिका आयुक्तांनी कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत नवीन आदेश जारी केले आहेत.

अत्यावश्यक कर्मचारी वगळता इतर कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत. सर्व विभाग प्रमुखांनी कार्यालयात अत्यावश्यक असलेले कर्मचारीच उपस्थित ठेवावेत. इतर कर्मचार्‍यांना घरूनच काम पाहण्याबाबत सूचना द्याव्यात.

अत्यावश्यक काम असेल तरच संबंधित कर्मचार्‍यांनी कार्यालयात यावे, ज्यांना घरून काम करण्याच्या सूचना असतील त्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या