शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
श्री साईबाबांवर (Sai Baba) देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान (Donate) अर्पण करत असतात. रविवारी अमेरिका (America) येथील साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांनी साईबाबांच्या चरणी 700 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट (Golden Crown) अर्पण केला.
- Advertisement -
हा मुकुट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर मुकुटाची (Golden Crown) किंमत सुमारे 1 कोटी 01 लाख 38 हजार आहे. या प्रसंगी साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दानशूर साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.





