Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशAmit Shah: पहिल्यांदा मोदींशी कधी भेट झाली, मैत्री कशी वाढली?अमित शाहांनी सांगितल्या...

Amit Shah: पहिल्यांदा मोदींशी कधी भेट झाली, मैत्री कशी वाढली?अमित शाहांनी सांगितल्या आठवणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील मैत्रीबद्दल नेहमीच चर्चा होते. हे दोन्ही नेते आधी गुजरातमध्ये सोबत काम करत होते. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रातही सोबत आहेत. त्यामुळे दोघांतील मैत्रीच्या नात्याची सुरूवात कशी झाली, याबद्दल सगळ्यानाच कुतूहल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली ओळख, त्यांना आलेल्या अडचणी, आव्हाने या सगळ्याबाबत चर्चा केली आहे. ८० च्या दशकात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची ओळख झाली. त्या आठवणीही अमित शाह यांनी सांगितल्या.

८० च्या दशकात मोदींना भेटलो
एका मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “मी पहिल्यांदा ८०च्या दशकात मोदींना भेटलो होतो, दशकाच्या सुरूवातीला. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते. संघाचे एक वरिष्ठ पदाधिकारी होते. त्यांचा एक अहमदाबादमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करण्यासाठी ते मी जिथे राहायचो, तिथे आले होते.”

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचे काम हे सगळे त्यांनी खूप छान समजावून सांगितले. मी त्यावेळी संघ स्वयंसेवक झालो होतो. देशातले तरुण संघाच्या माध्यमातून काय करु शकतो हे नरेंद्र मोदींनी त्यावेळी समजावून सांगितले होते. त्यामुळे मी प्रेरित झालो. संघाच्या सिद्धातांबाबत त्यांनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. माझी आणि त्यांची पहिली ओळख तिथेच झाली.

YouTube video player

तेव्हाही राष्ट्र प्रथम हीच भावना होती आणि आत्ताही हीच भुमिका
नरेंद्र मोदींच्या आधी मी भाजपात आलो, भाजपाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही दोघेही काम करु लागलो. सध्याच्या घडीला अशी स्थिती आहे की कोट्यवधी लोक हे समस्या निराकरणासाठी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा ठेवून आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही राष्ट्र प्रथम हीच त्यांची भावना होती. त्यानंतर पंतप्रधान झाले तेव्हाही त्यांची हीच भूमिका आहे असेही अमित शाह म्हणाले.

अमित शाह पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींनी गुजरातच्या विकासासाठीही काम केले आणि आता केंद्रात ११ वर्षांपासून ते विकासाचे धोरण पुढे घेऊन जात आहेत. ६० कोटी लोकांच्या घरी वीज पोहचवणे, शौचालय, गॅस, प्यायचे शुद्ध पाणी, दर महिन्याला पाच किलो धान्य, गरीबांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतच उपचार अशा योजनांना आकार दिला आणि त्या पूर्णत्वास आणल्या. असेही अमित शाह यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली...