Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअमित ठाकरेंची आशिष शेलारांसोबत बैठक; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

अमित ठाकरेंची आशिष शेलारांसोबत बैठक; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील रस्ते आणि ट्रॅफिकच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट नेमके कोणत्या कारणासाठी घेतली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गणेशोत्सव सुरू होत आहे त्यामुळे त्याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट आहे का? की आणखी काही कारण आहे याबाबत चर्चां राजकीय वर्तुळा रंगल्या आहेत. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहिनुसार, अमित ठाकरे यांनी सकाळी ९.३० च्या सुमारास वांद्रे येथील कार्यालयात आशिष शेलार यांची भेट घेतली. गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली. अमित ठाकरे यांनी याबाबतचे एक निवेदन आशिष शेलार यांना दिले आहे. २६ तारखेला परीक्षा आहेत. माझे म्हणणे आहे की, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. २७ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महाराष्ट्राचा उत्सव आहे. अनेकाना गावी जायचे असते. परंतु, परीक्षेचा ताणही कायम राहतो. यामुळे परिपत्रक सांस्कृतिक मंत्र्यांकडे जावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.

राजकीय चर्चा नाही झाली
आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आमची जी चर्चा झाली त्यात राजकीय काही झाले नाही. टीका राजकीय होतात, वैयक्तिक होत नाही. त्यामुळे वैयक्तिक दुरावा नाही, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे अमित ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा मुंबईत पाणी साठले नाही. मी वारंवार म्हटले आहे की, यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे. नाशिकमध्ये सत्ता दिली तेव्हा पाहिले ना काय काम झाले, आता मुंबईत ही संधी द्या, असे त्यांनी म्हटले आहे. आता अमित ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुंवया उंचावल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...