Thursday, March 13, 2025
HomeमनोरंजनAmitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीर माफी, व्हिडीओ शेअर करत...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीर माफी, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझी चूक…”

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नावलौकिक आहे, गेल्या अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत.

- Advertisement -

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात आणि त्यांच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देतात. त्याचबरोबर जगातील घडणाऱ्या घडामोडींवरही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. अशातच अमिताभ बच्चन यांनी एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे माफी मागितली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून मराठी कलाकारांसह नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी “मी कचरा करणार नाही” असं म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचं आवाहन केलं होतं. पण, हा व्हिडिओ करताना मराठी बोलण्यात बिग बींकडून मोठी चूक झाली होती. मित्राने सांगितल्यानंतर बिग बींच्या ही चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ शेअर करत चुकीचं मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, नमस्कार मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी व्हिडीओ केला होता की, मी कचरा करणार नाही. ते मी मराठीमध्ये म्हटलं होतं. मी ‘कचरा’ या शब्दाचा उच्चार चुकीचा केला होता. माझा मित्र सुदेश भोसलेने सांगितलं, तुम्ही कचरा शब्दाचा उच्चार चुकीचा केला आहे. तर मी हा परत व्हिडीओ करतो आणि म्हणतो, मी कचरा करणार नाही. धन्यवाद. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका व्हिडीओमध्ये चुकीचा उच्चार केला होता. म्हणून दुरुस्त केलं आहे. क्षमस्व”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...