Friday, November 20, 2026
Homeक्राईमपुतण्याने काकूचे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरले

पुतण्याने काकूचे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

काकूच्या घरातील तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने पुतण्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी काकूने दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या वैभव शिरसाठ याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगीता शिवाजी शिरसाठ (रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, त्यांनी वेळोवेळी खरेदी केलेले सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने घरात ठेवले होते.

- Advertisement -

दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराची साफसफाई केल्यानंतर किचनमधील ओट्यावर पातेल्याखाली असलेल्या बॉक्समध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यानंतर दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी दागिने काढण्यासाठी शोध घेतला. मात्र, दागिने जागेवर मिळून आले नाहीत. घरात सर्वत्र शोध घेऊनही दागिने न सापडल्याने त्यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये राणीहार, एक मोठे गंठण, एक मिनी गंठण आणि कानातील झुंबर अशा एकूण दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. संगीता शिरसाठ यांचा पुतण्या वैभव बापुसाहेब शिरसाठ हा त्यांच्या घरी वारंवार ये-जा करत असल्याने त्यानेच दागिने चोरून नेले असावेत, असा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. या फिर्यादीवरून वैभव बापुसाहेब शिरसाठ (रा. उंबरे, ता. राहुरी) याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1273/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : खंडेरायवाडी येथे विवाहित महिलेचा खून

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील खंडेरायवाडी येथील एका विवाहित महिलेला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि.19) सकाळी तिचा मृतदेह साकूरदरा येथील खोल...