Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगावात दगडफेक; दाेन पाेलिस जखमी

जळगावात दगडफेक; दाेन पाेलिस जखमी

जळगाव – Jalgaon –पिंप्राळा हुडकोमधील सिद्धार्थनगर परिसरातील किरकोळ कारणावरुन गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला वाद सोमवारी रात्री १०.३० वाजता चिघळला. यातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. तर दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील सात पुरुष व एका महिलेस अटक झाली.

दोन्ही गटात काही दिवसांपासून किरकोळ कारणावरुन वाद सुरू आहेत. हा वाद दोन दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचला. पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गटातील जमाव समोरासमोर आल्यानंतर ते एकमेकांशी भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप महिलांमधील हाणामारी नियंत्रणात आली.

- Advertisement -

पिंप्राळा हुडको हाणामारीत अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रामानंद नगर पोलीस स्टेशन मधून त्यांना कोठडीत नेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या