Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश

आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिट्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. परांजपे यांच्या या तडकाफडकी निर्णयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसला आहे. या प्रवेशानंतर परांजपे यांची शासनाच्या एका प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने परांजपे हे नाराज होते. शिवाय पक्षातील अंतर्गत घडामोडीमुळे ते राष्ट्रवादीत अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र परांजपे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना दिले आहे. परांजपे यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता आणि ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक अशी पदे होती.

राष्ट्रवादीचा राजीनामा देताच परांजपे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या कार्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, दादाजी भुसे, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

पडसाद : पिंपळगाव बाजार समितीच्या सभेचे कवित्व

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे | संपादक, दै. देशदूत श्रीमंत बाजार समिती म्हणून जिचा लौकिक गेली पंचवीस वर्ष टिकून आहे अशा पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार...