Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशAditya L1 च्या प्रक्षेपणापूर्वी ISRO च्या वैज्ञानिकांनी घेतलं श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन......

Aditya L1 च्या प्रक्षेपणापूर्वी ISRO च्या वैज्ञानिकांनी घेतलं श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन… पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेला यश मिळत असतानाच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून (ISRO) आणखी एका मोहिमेच्या तयारीला वेग आला आहे. ही मोहिम म्हणजे, इस्रोची सूर्य मोहिम आदित्य एल-१(Aditya L-1 Mission).

- Advertisement -

इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहीम PSLV-XL रॉकेटच्या मदतीने उद्या (२ सप्टेंबर) रोजी लाँच होणार आहे. या लाँचपूर्वी इस्त्रोमधील शास्त्रज्ञांच्या एका टीमने आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. महत्वाचे म्हणजे वैज्ञानिकांनी आदित्य-L1 मिशनची लहनशी प्रतिकृती सोबत घेऊन मंदिरात जात या मोहमेच्या यशासाठी प्रार्थना केली.

मिशन आदित्य एल1 मिशन आहे तरी काय?

आदित्य एल-1 मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोच्या प्रमुखांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, ‘आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून लॉन्च केली जाईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य L-1 या अंतराळयानाला L-1 बिंदूवर घेऊन जाईल. L1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच 15 लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 15 कोटी किलोमीटर आहे.

इस्रोचे प्रमुख पुढे बोलताना म्हणाले की, आदित्य एल-1 मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे. प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य-L1 ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा जरा जास्त काळा चालेल. आदित्य-L1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) समाविष्ट केलं जाईल. जिथे L1 पॉईंट आहे. हा पॉईंट सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत तो फक्त 1 टक्के आहे. या प्रवासासाठी 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे अवघड मानलं जातं, कारण त्याला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जावं लागतं.

या मोहिमेतील आव्हानं

या मोहिमेदरम्यान असणारा सर्वात मोठा धोका म्हणजे यानाचा वेग. जर, आदित्य एल-१ च्या वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही, तर हे यान सूर्याच्या दिशेने जाताना वाटेतच नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यानाचा वेग कमी करता आल्यासच ही मोहिम यशस्वी ठरेल.

भारता आधी कोणत्या देशांनी सुर्याची मोहिम केली आहे?

भारताच्या आधी अमेरिका, जापान, यूरोप आणि चीनने सूर्याचा अभ्यास केलाय. सूर्यावर जाणारा भारत पहिला देश नाहीय. हे भारताच सूर्याच्या दिशेने पहिले पाऊल नक्की आहे. त्यामुळे आता सर्व जगाची नजर या मिशनवर असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या