Monday, May 20, 2024
Homeधुळेदुचाकीवरून तोल गेल्याने अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

दुचाकीवरून तोल गेल्याने अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शिरपुर-शहादा रस्त्यावर टेकवाडे फाटा ते भामपूर दरम्यान दुचाकीवरून (bike) जात अचानक तोल (loss of balance) गेल्याने तोरखेडा येथील अंगणवाडी सेविकेचा (Anganwadi worker) मृत्यू (dies) झाला. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनिषा गोपाळ चौधरी (वय 41 रा.तोरखेडा) असे मयत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

मनिषा ही तिच्या पती गोपाळ चौधरी यांच्या सोबत अमळनेर येथून शिरपुर-शहादा रस्त्याने दुचाकीवरून तोरखेडा येथे जात असतांना टेकवाडे फाटा ते भामपूर फाटा दरम्यान भरीत सेंटर जवळ दुचाकीवर मनिषाला डुलकी आल्याने दुचाकीवरून (bike) अचानक तिचा तोल गेल्याने (loss of balance) रस्त्यावर पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या पतीने खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) दाखल केले. तेथे डॉ.गुलाबराव पाटील यांनी मनिषाला तपासणी मयत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय लखन गुसिंगे यांनी शहर पोलीस (police) ठाण्यात खबर दिल्याने त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोना अनिल शिरसाठ हे करीत आहेत. मनिषाचे सासर व माहेर तोरखेडा येथीलच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या