Thursday, May 2, 2024
Homeजळगावयुवतीच्या मृत्यूप्रकरणी संघटनांचा संताप

युवतीच्या मृत्यूप्रकरणी संघटनांचा संताप

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पारोळा तालुक्यात मंगळवार दि.10रोजी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दलित युवतीवर अत्याचार करून तिला विष पाजून हत्या करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

- Advertisement -

या घटनेचे पडसाद जिल्हास्तर उमटले असून अत्याचारग्रस्त युवतीच्या मारेकर्‍यांना अटक करून कठोर कारवाईसह फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांचेसह पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे कि, पारोळा तालुक्यातील टोळी येथील 20 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या युवतीवर गुंड प्रवृत्तीच्या 3 जणांनी अत्याचार करून तीला वीष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हि घटना उघडकीस आल्यानंतर युवतीस उपचारार्थ धुळे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला असून या घटनेत दोषी असलेल्या तीनही संशयीतांवर तात्काळ अटक करण्यात यावी.

हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येवून पिडीतेच्या परीवाराला पोलिस संरक्षणासह दुसर्‍या ठिकाणी पूनर्वसन करण्यात यावे अशी मागणीसह निदर्शने करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या.

या निवेदनावर कार्याध्यक्ष भानुदास विसावे, पांडूरंग बावीस्कर, उत्तम मोरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संविधान जागर समितीचे मुकूंद सपकाळे, जयश्री विसावे, भारती बावीस्कर, जि.प.सदस्य पल्लवी सावकारे, प्रमोद सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा रजनी पाटील, निता वानखेडकर विजया महाले,जि.प.कर्मचारी आघाडीचे बी.बी.मोरे, भगवान बावीस्कर परशुराम गांगुर्डे सुनिल वाघ, गोरख ठाकरे,वैशाली गांगुर्डे, ईश्वर अहिरे, बहुजन क्रांती मोर्चाचे साहेबराव वानखेउे, सुरेंद्र तायडे, शांताराम उशीर, छावा मराठा युवामहासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मंगेश मोरे, उत्तम महाले, संजय वानखेडे आदी विविध संघटनेच्या पदाधिकारींच्या सह्या आहेत.

सिआयडी चौकशीची मागणी

पारोळा तालुक्यातील नियोनबद्धरित्या कटाव्दारे युवतीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा वर्ल्ड दलित ऑरगॅनायझेशन ऑरगनाझेशनतर्फे निषेध करण्यात येवून या घटनेची पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्यात यावी यात अजून आरोपी असण्याची शक्यता असून याची निष्पक्षपणे चौकशीसाठी सीआयडी तपासाची मागणीसह पिडीतेच्या परीवाराला संरक्षण देण्याची मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी देण्यात आले. यावेळी निवेदिता ताठे, सचिन अहिरे, सिद्धार्थ पवार, कुणाल मेारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या