Wednesday, February 25, 2026
Homeनाशिकधक्कादायक! मालेगाव मनपा विद्युत अधीक्षक कार्यालयात संतप्त नागरिकांकडून सामूहिक नमाजपठण, नेमकं कारण...

धक्कादायक! मालेगाव मनपा विद्युत अधीक्षक कार्यालयात संतप्त नागरिकांकडून सामूहिक नमाजपठण, नेमकं कारण काय?

मालेगाव | प्रतिनिधी
शहरातील लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह प्रभागातील मुस्लिम नागरिकांनी प्रभागात वारंवार मागणी करून देखील बंद पथदीप सुरू केले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेत विद्युत विभाग अधीक्षकांच्या कार्यालयातच नमाजाची वेळ झाल्याने सामूहिक नमाज पठण केले नमाज पठणाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! मालेगाव मनपा विद्युत अधीक्षकांच्या कार्यालयात संतप्त नागरिकांकडून सामूहिक नमाजपठण

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महानगरपालिका कार्यालयात करण्यात आलेल्या नमाज पठणाच्या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच महानगरपालिका विद्युत विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. शासनाची वास्तू असलेल्या महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, मनपा कार्यालयात झालेल्या या नमाज पठणाने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player

ताज्या बातम्या

स्थायी

Nashik News: स्थायी समितीची धुरा मच्छिंद्र सानप यांच्या हाती; सभापतीपदी बिनविरोध...

0
नाशिक | प्रतिनिधीमहापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सकाळी पार पडली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली...