Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमCrime News: पंधरा हजारांची लाच घेताना सरपंचासह पतीला अटक

Crime News: पंधरा हजारांची लाच घेताना सरपंचासह पतीला अटक

दिंडोरी | प्रतिनिधी
रासेगाव व देहरेवाडी येथील ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे गावाचे उपसरपंच असून, त्यांच्या विरोधातील अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये ठरले, ज्यापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीने सापळा रचून या दाम्पत्याला पकडले. सरपंचांनी स्वतः १४ हजार रुपये तर त्यांच्या पतीने एक हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori जनगणनेचे प्रात्यक्षिक (Census Demonstration) करण्यासाठी कर्मचारी दिंडोरी शहरातील घरोघरी जात असून प्रात्यक्षिकांमुळे दिंडोरी शहरात (Didnori City) सुध्दा जनगणनेविषयी औत्सुक्य...