Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआजही चौकशीला हजर राहणार नाही, अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

आजही चौकशीला हजर राहणार नाही, अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

मुंबई

100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

- Advertisement -

भंडारदर्‍याचे निसर्ग सौंदर्य, धुक्यात हरविलेली गावे आणि आदिवासींच्या व्यथा

राज्याचे गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे (mumbai) तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ईडीने देखमुख यांना याआधी तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देऊन ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे.

देशमुख यांच्या वतीने वकील इंदरपाल उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने अनिल देशमुख यांनी ईडीचा तपास अधिकाऱ्यांचे नावे एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वकील इन्‍दरपाल बी सिंग हे उपस्थित राहतील असे पत्राद्वारे कळवले आहे. या पत्रामध्ये अनिल देशमुखांनी लिहिले की, ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या